बहुजनांच्या मुलांची माथी भडकावण्यापेक्षा आधी आपल्या मुलाला दंगलीत उतरवा - सुजात आंबेडकर यांचे राज ठाकरे यांना आव्हान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


बहुजनांच्या मुलांची माथी भडकावण्यापेक्षा आधी आपल्या मुलाला दंगल करण्यासाठी उतरवा अशा शब्दांमध्ये सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे.[ads id="ads1"] 

वंचीत बहूजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी आज राज ठाकरे यांना अव्हान देतांना एक वादग्रस्त विधान केले असून, दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असे सुजात आंबेडकर म्हणाले आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला आमंत्रण मिळाले आहे.[ads id="ads2"] 

यावेळी बोलताना सुजात म्हणाले की, आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहूजन मुलं असतात असे सुजाता आंबेडकर म्हणाले. तसेच राज ठाकरेंना माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे, असेही सुजात म्हणाले.

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले की, जर भाजप किंवा राज ठाकरे असेच हिंदू-मुस्लिम दंगलीवर बोलत असेल तर त्याचा सरळसरळ असा अर्थ होतो की, येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. जेणेकरून महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष जाऊ नयेत, असेही सुजात आंबेडकर म्हणाले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!