ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाच्या रावेर तालुका समन्वयक पदी ऐनपुर येथील तुषार कचरे यांची निवड करण्यात आली आहे युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांची उल्लेखनीय कामगिरी बघता पुन्हा एकदा त्यांना नवीन जबाबदारी मिळाली आहे.[ads id="ads1"]
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री . उध्दवजी ठाकरे साहेब व शिवसेना नेते , युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना नेते , राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकार मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब , मा . खासदार डॉ . श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या तालुका समन्वयक रावेर या पदासाठी निवड करण्यात आली आहे .[ads id="ads2"]
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर - गरीब , गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रूग्णांना धर्मादाय रुग्णालयांत ( १० % + १० % ) राखीव खाटा उपलब्ध करूण देने , निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णत : मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे तसेच गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी श्री . सिध्दिविनायक ट्रस्ट , टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यामातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास किंवा ठाणे येथील कोपरी मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधावा असे तुषार कचरे यांना मिळालेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
*तुषार कचरे यांनी मानले आभार*
तुषार कचरे यांनी या नियुक्ती बद्दल आभार व्यक्त करतांना पवित्र अशा श्री रामनवमी च्या शुभ दिनी एक अविस्मरण असा क्षण मी करत असलेल्या रुग्ण सेवेची व सामजिककार्य ची दखल घेत अजुन एक मोठी जबाबदारी मला मिळाली मा श्री हिंदुहृदयसम्राट सरसेनापती वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मा श्री मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब मुक्ताईनगर विधानसभा सदस्य आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या आशीर्वादाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे सर. जळगाव, धुळे , नंदुरबार समन्वयक जितेंद्रजी गवळी, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. मोईज एस. देशपांडे यांच्या माध्यमातून वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या रावेर तालुका समन्वयक पदी माझी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रावेर तालूका समन्वयक या नवीन मिळालेल्या जबाबदारीचे सोने करून माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीवर शिवसेना पक्ष जो माझ्यावर वारंवार विश्वास दाखवत आहे तो सार्थ ठरवून तसेच नेतृत्वाला अभिमान वाटेल अस कार्य करेल हा शब्द व वचन देतो.
मी स्वतःला भाग्यवान समजतो, रुग्णांची सेवा करण्याची संधी प्रत्येकाच्या नशिबी नसते ती संधी मला माझ्या पक्षाने दिल्याबद्दल मी पक्षाचा व शिवसेना नेतेमंडळी तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांचे हृद्यपूर्वक आभार व धन्यवाद मानतो.
यावेळी सर्वच क्षेत्रातील व्यक्तींकडून युवासेना उपतालुका प्रमुख तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रावेर तालुका समन्वयक तुषार कचरे यांचे अभिनंदन होत आहे.