वाघ यांची RTI जिल्हाध्यक्षपदी तर धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - धरणगाव चे सुपुत्र ओबीसी मोर्चा चे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ यांची नुकतीच आर.टी.आय. च्या जिल्हाध्यक्षपदी व धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल एरंडोल येथे महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या वतीने अनमोल ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.[ads id="ads1"]
राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या वतीने धुळे येथील सत्यशोधक डॉ. सुरेश झाल्टे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सत्यशोधक प्रा. विश्वासराव पाटील, सुधाकर बडगुजर व प्रमुख वक्ते डॉ. सुरेश झाल्टे यांच्या शुभहस्ते आबासाहेब राजेंद्र वाघ यांना सावित्रीमाई फुले यांचा अनमोल ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.[ads id="ads2"]
याप्रसंगी एरंडोल नगरीचे माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, विजय महाजन, दुर्गादास महाजन, रवींद्र महाजन, राजेंद्र महाजन, प्रकाश महाजन, शिवदास महाजन, कविराज पाटील, धरणगाव येथील सत्यशोधक हेमंत माळी, लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख, आकाश बिवाल, पी.डी.पाटील, निलेश पवार तसेच महात्मा फुले युवा क्रांती मंच चे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते, एरंडोलवासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.