रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हिवताप जनजागृती मोहीमेला सुरुवात झाली येत्या 25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन असल्याने संपूर्ण एप्रिल महिला आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.[ads id="ads1"]
या मोहिमेत गप्पी मासे सोडणे, खोल खड्डे बुजविणे , पाण्याच्या टाक्या, हौद, टाकाऊ टायर, कंटेनर सर्वेक्षण करणे , गटारी वाहत्या करणे व हिवताप आणि आरोग्य विषयक म्हणी लिहिणे आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे असे आव्हान करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
तालुका हिवताप पर्यवेक्षक श्री विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक श्री चंपालाल महाजन, आरोग्य सहाय्यक श्री अविनाश तायडे, आरोग्य सेवक श्री कुशल पाटील, आरोग्य सेवक श्री दिनेश चौधरी , आरोग्य सेवक श्री राजेंद्र भालेराव, आरोग्य सेवक चंद्रकांत चौधरी , आरोग्य सेवक श्री जितेंद्र सोनवणे हे या मोहिमेला यशस्वीरित्या राबवित आहे.