धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाची बैठक नुकतीच धरणगाव येथील शासकिय विश्रामगृह येथे आयोजित केली होती. गेल्यावर्षी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली होती.[ads id="ads1"]
त्यावेळी सर्वांच्या मते तालुकाध्यक्षपदी ॲड. व्ही.एस.भोलाणे तसेच शहराध्यक्षपदी लक्ष्मण माळी यांची निवड करण्यात आली होती व त्या निवडीमध्ये ठरविण्यात आले होते की प्रत्येक वर्षी तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष निवडण्यात यावे. त्याप्रमाणे तालुका अध्यक्ष ॲड. व्ही.एस. भोलाणे व शहराध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी राजीनामा दिला व दोन्ही पदाधिकाऱ्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यानंतर एकमताने धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी आबासाहेब राजेंद्र जगन्नाथ वाघ व शहराध्यक्षपदी विनोद रोकडे यांची निवड एकमताने करण्यात आली. तत्पूर्वी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.[ads id="ads2"]
याप्रसंगी मावळते तालुकाध्यक्ष ॲड. व्ही.एस.भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी त्याचप्रमाणे नवनियुक्त तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ व शहराध्यक्ष विनोद रोकडे यांचा सत्कार सर्व पत्रकारांच्या वतीने करण्यात आला. नवनियुक्त तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांना पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडीप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाची बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात विविध विषयांवर चर्चा करून संपन्न झाली.


.jpg)