जळगावकरांच्या विनंतीचा गडकरींजीनी केला सन्मान

अनामित

जळगाव -  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री मा.ना.श्री.नितीनजी गडकरी साहेब आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. शुक्रवार, दि. 22 एप्रिल 2022 रोजी दुपारी मा.ना.श्री.नितीनजी गडकरी साहेबांचे जळगावात आगमन झाले. सायंकाळी शहरातील शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राऊंड) येथे आयोजिलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात महामार्गाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत मा.ना.श्री.गडकरी साहेबांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील, माजी मंत्री व आमदार मा.श्री. गिरीशभाऊ महाजन, खासदार मा.श्री. उन्मेशदादा पाटील, खासदार मा. रक्षाताई खडसे, आमदार मा.श्री. सुरेश दामू भोळे (राजूमामा), जळगावचे जिल्हाधिकारी मा.श्री. अभिजीतजी राऊत, महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन, आमदार मा.सौ. लताताई सोनावणे, आमदार मा.श्री. मंगेश चव्हाण जी, आमदार मा.श्री. चंदूभाई पटेल, आमदार मा. स्मिताताई वाघ तसेच इतर आमदार, अधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपस्थितीत होते. 


यावेळी जळगावकरांच्या वतीने महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी मा.ना.श्री.नितीनजी गडकरी साहेबांना जळगाव शहर संदर्भात दोन निवेदन दिले. पहिल्या निवेदनांत महापौरांनी जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतून जाणारा मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर ठिकठिकाणी उड्डाणपुल विकसित करुन मिळणेबाबत गडकरी साहेबांना विनंती केली. "बांभोरी जवळील जुने जकात नाक्यापासून ते पुढे खोटे नगर स्टॉप, शिव कॉलनी, अग्रवाल हॉस्पिटल, आकाशवाणी चौफुली, इच्छादेवी चौफुली, नेल्सन मंडेला चौफुली, कालिंकामाता मंदिराजवळील चौफुली असा संपूर्ण सुमारे 7 किलोमीटरचा महामार्ग हा उड्डाणपुल म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. तसेच या राष्ट्रीय महामार्गलगतचे 12 मीटरचे सेवामार्ग विकसित केल्यास अवजड वाहने हे उड्डाणपुलावरुन जातील व शहरातील नागरिकांची वाहने सेवामार्गाचा अवलंब करतील." 


दुसरा निवेदनात जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतून जाणारे मुंबई, नागपुर, पाचोरा, इंदौर व औरंगाबाद महामार्गाला जोडणारे रस्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विकसित करुन मिळणेबाबत विनंती केली. “शिव कॉलनी राष्ट्रीय महामार्ग क्र. एन 53 पासून निघणारा व पाचोरा राष्ट्रीय महामार्ग क्र. एन 753जे तसेच औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. एन753एफ ला जोडणारा 30 मीटर रुंद रस्ता तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 दिपक फुडस्च्या पश्चिम बाजुने जाणारा 18 मीटर रुंद रस्ता व वाटिका आश्रम लगत राष्ट्रीय महामार्ग क्र. एन 53 पासून पिंप्राळा गट क्र. 118 मधुन जाणारा पिंप्राळा गट क्र. 244 पर्यंत जाणारा 24 मीटर विकास योजना रस्ता जळगाव शिवार स.क्र. 307 दुध फेडरेशन पासून निघणारा व जळगाव स.क्र.118 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र.एन 53 ला जाणारा 24 मीटर रुंद विकास योजना रस्ता, रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग, भारत सरकार, यांचे निधीतून आवश्यक ती संपादन प्रक्रिया करुन विकसित करुन मिळावे"


जळगाव शहरातून जाणाऱ्या व जळगाव शहराला जोडणाऱ्या महामार्गांन संदर्भात ही दोन निवेदने महापौरांनी मा.ना.श्री.नितीनजी गडकरी साहेबांना दिली. खान्देशच्या विकास साठी गडकरी साहेबांनी भरीव निधी दिला आणि वेळेत सर्वे काम पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!