रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) प्रकाशमय जनहीतकारी बहुउद्देशीय संस्था रावेर यांच्या वतीने आयोजित क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त रावेर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यलयाचे उद्घाटन रावरचे आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads2"]
विविध क्षेत्रातयश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष हरीश शेठ गनवानी, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,माजी नगरसेवक योगेश गजरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, श्री मंगल बोदडे(अध्यक्ष प्रकाशमय बहुउद्देशीय संस्था)दिलरुबाब तडवी प्रताप राठोड महेंद्र पवार दिलीप साबळे शुभम नमायते यांचेसह आदी जण उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाशमय जनहीतकारी बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष श्री बोदडे, उपाध्यक्ष ज्योती वाघ व सचिव जयश्री साळुंके यांनी परिश्रम घेतले.