भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा (पानाचे) येथे (दि.६) रोजी सापडलेल्या अनाेळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख येथील तालुका पाेलिसांनी पटवली.मृतदेहाच्या छातीवर 'भील राज' व दंडावर 'तेरे नाम' असे गाेंदले होते. त्यानुसार ओळख पटवत कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. अजय मोरे (वय ४०) असे त्याचे नाव आहे.[ads id="ads1"]
अधिक माहिती अशी की, कुऱ्हेपानाचे येथे ६ एप्रिलला रात्री २ वाजता अनोळखी मृतदेह सापडला होता. हा मृतदेह पोलिसांनी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात शवागारात रवाना केला. त्याच दिवशी सायंकाळी लक्ष्मी अजय माेरे नावाच्या महिलेने तिचा पती बेपत्ता झाल्याची नोंद केली. [ads id="ads2"]
महिला गेल्यावर कुऱ्हा येथे सापडलेला मृतदेहाची माहिती संदीप बडगे यांनी कुऱ्हा बीटचे हवालदार दीपक जाधव यांना विचारली. या मृतदेहाच्या छातीवर भील राजा व हातावर तेरे नाम असे गाेंदल्याची माहिती त्यांनी दिली. महिलेने पती हरवल्याच्या तक्रारीत हाच उल्लेख होता. त्यामुळे पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला. त्यात महिलेने अनोळखी मृतदेह पतीचा असल्याचे ओळखले. मृतदेह सोमवारी तिच्याकडे देण्यात येईल.