१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग करताना या दोघांनी पीएसएमएस या सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब न करता बेकायदेशीररीत्या धनादेशाद्वारे खरेदी करून अनुक्रमे अडीच ते चार लाख रुपयांचा अपहार केल्याचा दोषारोप ठेवून जिल्हा परिषद सेवेतून निलंबनाचे आदेश रावेर च्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल (Raver BDO Dipali Kotwal) यांनी शुक्रवारी दिनांक १ रोजी पारित केले.[ads id="ads2"]
खिर्डी बुद्रुक (Khirdi Budruk) ग्राम सचिवालयाचे ग्रामविकास अधिकारी विजय काशीनाथ महाजन यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदी करताना थेट धनादेशाचा बेकायदेशीररीत्या वापर करून सुमारे अडीच लाख रुपयांचा अपहार केल्याचा दोषारोप आहे.
मोहमांडली (Mohmandali) ग्राम पंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक तबारत तडवी यांनीही १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून आर्थिक अनियमितता राखून सुमारे चार लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.


