बोदवड तहसीलदारांसह चौघे एसीबीच्या जाळ्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 आठ हजारांची लाच घेतांना बोदवड तहसीलदारासह ( Bodwad Tahsildar) वाहन चालक, तलाठी आणि एका खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचा व्यवसाय आहे. अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैश्यांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आठ हजाराची मागणी केली होती.[ads id="ads2"] 

 त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणीसाठी जळगावच्या लाचलुचपत विभागाने आज सापळा रचला होता. यावेळी बोदवडचे तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह तलाठी, त्यांचा वाहन चालक आणि एका खासगी पंटरला जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने आठ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!