धरणगाव (पी.डी.पाटील सर) आज दि.२ एप्रिल, २०२२ शनिवार रोजी आबासाहेब राजेंद्र वाघ यांच्या "सत्यशोधक निवासस्थानी " बहुजन क्रांती मोर्चा धरणगाव च्या वतीने शिवराय - फुले - शाहू - आंबेडकरी विचारांचे वारसदार सत्यशोधकीय, त्याचप्रमाणे धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे सदस्य आबासाहेब राजेंद्र जगन्नाथ वाघ यांची स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. [ads id="ads1"]
कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार व उपस्थित मित्र परीवार यांच्या हस्ते आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा सपत्नीक महापुरूषांचे अनमोल ग्रंथ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची निवड करण्यात आली. याबाबत नक्कीच सर्वाँना न्याय देण्याचं कार्य आबासाहेब यांच्या हातून घडेल असे प्रतिपादन कैलास पवार यांनी केले.[ads id="ads2"]
याप्रसंगी कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी, तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील, कार्याध्यक्ष सुधाकर मोरे, महादू अहिरे, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार, बामसेफचे उपाध्यक्ष विलास कढरे, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष नगरभाई मोमीन आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांनी आबासाहेब वाघ यांचे मनस्वी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


