रावेर - महाराष्ट्र शासन कार्यकारी अभियंता सा.बा.(आदिवासी विभाग नाशिक) २२२५ अनुसूचित जाती जमाती इतर मागास वर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण यावरील भांडवली खर्च यातुन मजूर झालेल्या शासकीय आश्रम शाळा लालमाती ता. रावेर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येत असुन आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या कामाचा संपूर्ण आढावा घेतला आणि कॉंकक्रेटीकरण चांगल्या दर्जाचे करण्यात यावे असे या वेळी ते बोलले तर..
या प्रसंगी रावेर यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष मधुकर चौधरी, यावल प्रकल्प अधिकारी श्रीमती विनिता सोनवणे उपअभियंता सार्वजनीक आदिवासी बांधकाम विभाग धुळे श्री कोलते साहेब लालमाती उपसरपंच गणेश पवार श्री पिंटू पवार श्री बबलू तडवी चिंचाटी उपसरपंच छोटू तडवी मुजलवाडी सरपंच योगेश पाटील श्री गुलशेर तडवी श्री दिलरुबाब तडवी श्री संतोष पाटील श्री राहुल पाटील व लालमाती येथील ग्रामस्थ व शासकीय आश्रम शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते......



