रावेर मधील व्ही एस नाईक महाविद्यालयातील तीन खेळाडूना खेलो इंडिया आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक प्राप्त

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) - जैन विद्यापीठ ,बंगलूर कर्नाटक येथे झालेल्या खेलो इंडिया आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेर येथील श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालयाच्या खेळाडूंनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगावचे प्रतिनिधित्व करून सदर स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करत १ सुवर्ण ,२ रौप्य पदक पटकाविले.[ads id="ads1"] 

१. कु.गोविंदा सुनील महाजन - २५२ किलो वजन उचलून सुवर्ण पदक मिळवले.

२.)कु.उदय अनिल महाजन - २२७ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले .

३) कु. किरण रवींद्र मराठे - २७७ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले.

४ ) अभिषेक गणेश महाजन -सहभाग या अतिशय चुरसीच्या स्पर्धेत खेळाडूंनी हे यश प्राप्त केले.[ads id="ads2"] 

    विद्यापीठाचे संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. संजय भावसार, प्रा.क्रांती क्षीरसागर तर संघ प्रशिक्षक म्हणून प्रा.उमेश पाटील यांनी कार्य केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करत असतात. आज पर्यंत नाईक महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंगच्या विविध स्पर्धोंमध्ये १० पदक मिळवले आहेत.सदर खेळाडूना प्रशिक्षक म्हणून श्री. योगेश महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. गेली १५ वर्ष श्री.महाजन खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत.

श्री.योगेश महाजन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.खेलो इंडिया या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत कु.गोविंदा सुनील महाजन ह्याने सुवर्ण पदक मिळवले होते.सलग दोन वर्ष या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या गोविंदा सुनील महाजन या विद्यार्थ्याचे रावेर परिसरात कौतुक होत आहे. नाईक महाविद्यालय हे ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे.विविध खेळांमध्ये विद्यापीठ,राज्य,राष्ट्रीय स्तरावर शेकडो विद्यार्थी सहभागी घेत आहेत. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. हेमंतभाऊ नाईक, सर्व संचालक मंडळ , कुलगुरू प्रा.डॉ. व्ही.एल. माहेश्वरी ,प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल , विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. दिनेश पाटील,डॉ.अनिल पाटील सिनेट सदस्य, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.उमेश पाटील,उपप्राचार्य डॉ.व्ही.बी. सुर्यवंशी,नॅक समन्वयक डॉ.एस.आर.चौधरी,प्रा.एस.डी.धापसे, डॉ.जी.आर.ढेंबरे,प्रा.व्ही.डी. पाटील,प्रा.एम.एस.पाटील, डॉ.जे.एम.पाटील,प्रा.एस. यु.पाटील,प्रा.डॉ.ए.एन.सोनार,प्रा.डॉ. एल.सी.नेमाडे,प्रा.एम.एम.पाटील, प्रा.एम.एस.पाटील,डॉ.एस.जी. चिंचोरे ,प्रा.पी.व्ही.पाटील,प्रा.नरेंद्र घुले,प्रा.एस.बी.धनले,डॉ.संतोष गव्हाड,डॉ.बी.जी.मुख्यद्ल, प्रा.चतुर गाढे,प्रा.एम.डी. तायडे तसेच खेळाडूंचे मार्गदर्शक श्री.अजय महाजन,श्री.युवराज महाजन श्री. संदीप महाजनयांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.अभिनंदन करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!