रावेर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
निंभोरा - ताँदलवाडी जि.प. गटामधील मागिल पाँच वर्षात झालेल्या विविध कामांच्या चौकशीचा अहवाल मिळणे कामी दि० ४ एप्रिल २०२२ पासून पं. स. रावेर येथे बसपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे व आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या बबीता तडवी आमरण उपोषणास बसले होते.[ads id="ads1"]
आज उपोषणाचा दुसरा दिवस असतांना मा. गट विकास अधिकारी सो. पं० स रावेर यांनी या उपोषणाची दखल घेऊन मा. मुख्यकार्यकारी अधिकारी सो. जळगाव यांनी दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी सदर कामांची चौकशी करण्याकामी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षा व. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली असता [ads id="ads2"] सदर चौकशी समितीच्या अध्यक्षांनी सदर कामाच्या चौकशीचा अहवाल दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी देण्याचे मान्य कल्याचे लेखीपत्र उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर मा. गटविकास अधिकारी सो. पं. स. रावेर यांच्या विनंतीला मान देऊन २१ एप्रिला चौकशीचा अहवाल देण्याच्या व मागिल ७ महिने चौकशी अहवाल प्रलंबीत ठेवला म्हणून दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत सदर चौकशी समितीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या अटीवर २१ एप्रिल पर्यत उपोषण कर्त्यानी आमरण उपोषण स्थगित केलेले आहे.
यावेळी मा. गटविकास अधिकारी सो. यांनी उपोषणकर्त्यांना निम्बू शरबत पाजून उपोषण सोडविले यावेळी ग्रा.पं.विस्तार अधिकारी संदानशिव साहेब लोकसंघर्ष मोर्चाचे नूरमुहमद तडवी, आदिवासी, तडवी एकता मंचचे सलीम तडवी, अ. ज. विभाग काँग्रेसचे सावन मेढे, धुमाभाऊ तायडे, निळे निशाण समाजिक संघटनेचे महेश तायडे, दिलिप साबळे, ब.स.पा.चे ईश्वर जाधव, संतोष ढीवरे समाजिक कार्यकर्ते न्याज्योदिन शेख, विजय भोसले, नितिन गवई, संदीप गाढे, राष्ट्रवादीचे आदिवासीचे सेलचे चाँद खाँ तडवी, विलास गोमटे, किशोर भिवा तायडे, अशोक अटकाळे, भास्कर वाघ इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.