भुसावळातील सतर्क रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी संशयीत प्रवाशाच्या तपासणीनंतर 33 हजार रुपये किंमतीचा तीन किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. अप नवजीवन एक्स्प्रेस आल्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.[ads id="ads2"]
संशयास्पद हालचालीवरून कारवाई
भुसावळ रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक आर. के. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी गस्तीवर असताना अप नवजीवन एक्स्प्रेसमधून एक प्रवासी उतरल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची झडती घेतली असता बॅगेत 32 हजार 686 रुपये किंमतीचा सुमारे तीन किलो गांजा आढळला. अधिक कारवाईसाठी संशयीताला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, संशयीताने हा गांजा ओरीसा येथून आणल्याचा संशय असून आरोपी मुंबईतील रहिवासी आहे.