गावठी पिस्टल बाळगणारा तरुण जेरबंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

गावठी पिस्टल बाळगणारा तरुण जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून जामनेर-बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेलसमोरून गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या वरणगावातील तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात जामनेर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अनुराग लक्ष्मण सूनगत (20, रा.सिव्हील हॉस्पिटल क्वार्टर, वरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.[ads id="ads1"] 

गोपनीय माहितीवरून कारवाई 

जामनेर - बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेल समोर सार्वजनिक रस्त्यावर संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत हा तरुण हातात गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. [ads id="ads2"] 

  मंगळवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत (वरणगाव) यास अटक करण्यात आली तसेच आरोपीकडून 20 हजार रुपये किंमतीची गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आली. याबाबत किशोर राठोड यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयिी आरोपी अनुराग लक्ष्मण सूनगत (20, रा.सिव्हील हॉस्पिटल क्वार्टर, वरणगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!