ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल) ऐनपुर येथे निंभोरा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत ऐनपुर यांच्या संयुक्त विद्यमाने शांतता कमेटीची बैठक संपन्न झाली. सविस्तर वृत्त असे की कोविड १९ च्या प्रादूर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून सण, उत्सव, जयंती यावर शासनाने निर्बंध घातले होते.[ads id="ads1"]
परंतू आता कोविडची लाट ओसरली आहे यामुळे शासनाने निर्बंध उठवले आहे यामुळे निंभोरा पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शितलकुमार नाईक व गोपनीय शाखेचे स्वप्निल पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन पुढील आगामी काळात येणाऱ्या हनुमान जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी,महाविर जयंती रमजान ईद साजरी करण्यासाठी गावातील सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन एकोप्याने साजरा करावा.[ads id="ads2"]
ह्या आगामी सण उत्सवात कायदा व सुव्यवस्था सांभाळून अनुचित प्रकार घडू न देता शांततेत व उत्साहाने साजरे करा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शितलकुमार नाईक यांनी केले उत्सव आनंदाने साजरा करण्याकरिता काय केले पाहिजे जेणेकरून एकोप्याने जयंती उत्सव साजरा होईल यावर पोलीस उपनिरीक्षक शितलकुमार नाईक साहेब यांनी मार्गदर्शन केले
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यात "या"तारखेपर्यंत 37 (1) (3) कलम जारी
या नंतर ग्रामसुरक्षा दलात युवकांनी पुढाकार घेऊन गावाची सुरक्षा करण्याचे आव्हान केले या शांतता कमेटीच्या बैठकीत ऐनपुर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ शामू पाटील, भगवान महाजन, रघुनाथ पाटील,ग्रा.पं.सदस्य किशोर पाटील,अनिल जैतकर,सतिष अवसरमल, विलास अवसरमल, अतुल पाटील,नजीर मेंबर, पृथ्वीराज जैतकर, तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.