निंबोल प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर तालुक्यातील नविन निंबोल ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आढावा मासिक मिटिंग मधे आठवडे बाजार नविन निबोल येथे भरवण्याचा ठराव एकमताने पास करण्यात आला.विशेष म्हणजे जुने निंबोल येथे वर्षानुवर्ष बाजार भरत होता,पण जुनेनिंबोल 35 वर्षा पासून पुनर्वसन झाले आहे,तरी तेथे बाजार भरत होता.[ads id="ads2"]
कारण नविन निंबोल येथे बाजार भरविण्यासाठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध नव्हती,मग आता जागा खुप मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतने उपलब्ध करुन दिल्याने बाजाराची सोय झाली.
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यात "या"तारखेपर्यंत 37 (1) (3) कलम जारी
तसेच पहिल्याच दिवशी नागरीकांनी खुप मोठ्या प्रमाणावर बाजाराला प्रतिसाद मिळाला.सरपंच संजय पाटील ,उपसरपंच अशोक पाटील, ग्रामसेवक,M. D पाटील आणि सर्व ग्राम पंचायत सदस्य,यांचे गावातील लोकांकडून आभार व्यक्त केले जात आहे.