जळगाव जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) जारी करण्यात आले आहेत. सदर आदेश दिनांक 8 ते 22 एप्रिल दरम्यान लागू राहणार आहेत.[ads id="ads2"]
अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. एका प्रसिद्धी पत्रकानुसार सदर आदेशाबाबत त्यांनी या आदेशाबाबत कळवले आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये 8 ते 22 एप्रिल, 2022 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.