Yawal : वड्री विकासोच्या चेअरमनपदी उमाकांत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सावळे यांची बिनविरोध निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील)  यावल तालुक्यातील वड्री येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअमरनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची निवड करण्यात आली आहे .   
[ads id="ads1"]            

      तालुक्यातील वड्री येथील विविध कार्यकारी सहकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच संपन्न झाली, यात निवडणुकीत भाजपा पुरस्कृत जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सौ.सविता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातुन या निवडणुकीत सर्व जागांची बिनविरोध निवड झाली. दि.4 मार्च2022 रोजी वड्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सौ.सविता अतुल भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाच्या निवडणुकी साठी घेण्यात आलेल्या सभेत चेअरमनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.[ads id="ads2"] 

   यावेळी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या सभेला नवनिर्वाचित संचालक लिलाधर भगवान चौधरी,व्ही.पी.चौधरी, प्रमोद चौधरी,पकंज चौधरी, सचिन चौधरी,फत्तु तडवी, लुकमान तडवी,मुबारक तडवी, भागवत भालेराव,रेखा सुनिल पाटील,छाया रविन्द्र पाटील यांच्या सरपंच अजय भागवत भालेराव,अतुल भालेराव आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.या सभेत निवडणुक निर्णय आधिकारी म्हणुन संदीप शिंदे हे होते तर त्यांना संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे व शिपाई शब्बीर तडवी यांनी सहकार्य केले . यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालकांचे जिल्हा परिषद सदस्या सौ.सविता भालेराव यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार सचिव सुनिल सुरवाडे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!