चोपडा प्रतिनीधी (विश्राम तेले) गेल्या तीन वर्षापासून चौगाव परीसरातील कमी प्रमाणात पाऊस पडला परीणामी एकही पाझर तलाव भरला नाही .त्यामुळे पाण्याची पातळी चारशे ते पाचशे फुटावर गेली आहे.शेतकर्यांना आठच तास मिळणारी विज त्यातही कमी दाबाने व वारंवार खंडीत होणारा विज पुरवठामुळे उन्हाळी पिकांना पाणी देणे म्हणजे शेतकर्यांसाठी तारेवरची कसरतच म्हणावी लागेल.[ads id="ads1"]
तर आता पासुनच पाण्याचा काचकसरीने वापर न केल्यास मे पर्यंत मोठं जलसंकट उभं राहू शकतं.त्याच बरोबर नालाखोलीकरण ,व सिंचन विभागामार्फत बांधण्यात आलेल्या बांधामध्ये पावसाळ्यात जास्तीत जास्त क्षमतेने पाणी साठा होण्यासाठी बांधाच्या वरील भागास सुमारे दोनशे मीटर पर्यंत खोलीकरण होणे आवश्यक आहे.तसेच वन विभागातील तिनही पाझर तलावांचे खोलीकरण व बांड्या नाला वरील धरणावरील मोठ्या प्रमाणात होणारा पाझर दुरूस्ती करून कमी करणे गरजेचे आहे.[ads id="ads2"]
चौगाव परीसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी वन विभाग,सिंचन विभाग व ग्राम पंचायत यांनी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेणे गरजेचे आहे.पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी कशा प्रकारे अडवता येईल यावर लक्ष केंद्रीत गेले नाही तर भविष्यात अजून पाणी टंचाईचा सामना करावा लागेल यात शंका नाहीच.