धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव - भारतातील थोर समाज सुधारक, शिक्षण क्रांतीचे जनक, शिक्षणतज्ञ, छत्रपती शिवरायांची रायगडावर समाधी शोधुन पुण्यात पहीली १० दिवसाची शिवजयंती साजरी करणारे, शिवजयंतीचे खरे जनक, स्त्री शिक्षणाचे आद्य जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, बहुजनांचे कैवारी, उद्योगपती, विचारवंत, लेखक, शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीतज्ञ, अर्थतज्ञ, सत्यशोधक, क्रांतिसुर्य, महामानव, राष्ट्रपिता, तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सुवर्णमहोत्सवी शाळेत विनम्र अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार व ज्येष्ठ शिक्षक सी.एम.भोळे यांच्या हस्ते राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.[ads id="ads2"]
तात्यासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून हेमंत माळी सर यांनी तात्या साहेबांचा जीवनपट सांगुन शैक्षणिक व सामाजिक कार्य विशद केले.
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतले.