रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील कुंभारखेड्यातील कै.पांडू रामू बोंडे हे शेतकरी कुटुंब आदर्श कुटुंब म्हणून ओळखले जाते.कारण या बोंडे परिवारातील सदस्य संख्या खूप मोठी असूनही ह्यांच्यात सृजनशीलता, बंधूप्रेम , सदैव सहकार्य, परोपकार,दैवकार्या ची आवड असलेला कुंभार खेड्यातील एकमेव परिवार होय. ह्या कुटुंबातील बहुतेक महिला, पुरुष, मुलें मुली ह्या जवळपास पदवीधर आहेत.[ads id="ads1"]
त्याच बरोबर हे कुटुंब मुख्य व्यवसाय शेती करते, समाजातील विविध घटकांशी नेहमीच त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे.यातीलच कै.तुकाराम रामू बोंडे यांचें चिरंजीव इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट बोधगया, बिहार काॅलेजातील 182 मुलांमधून प्रणव बोंडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला असून तो डायरेक्टर गोल्ड मेडल्स चा बहुमान ही मिळविला आहे.[ads id="ads2"]
तसेच तो महाराष्ट्र राज्यातील पहिला विद्यार्थी ठरला असून त्याचा सत्कार बोर्ड ऑफ गव्हर्नर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बोध गया चे श्री संदीप घोष यांच्या हस्ते करण्यात आला.यामुळे प्रणव बोंडे यांच्या वर नातेवाईक, मित्र मंडळ, समाजातील विविध स्तरांतील मान्यवर मंडळी यांच्या कडून त्यांचे कौतुक करुन पुढिल वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.यात रावेर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार शिरीष दादा चौधरी, महामंडलेश्वर श्री जनार्दन जी महाराज, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे यांच्या समस्त कुंभारखेडा गावकऱ्यांनी प्रत्यक्षात भेटून प्रणव बोंडे यांचें अभिनंदन केले.


