थकीत मानधन व ईतर कामाचा मोबदला मिळावा या मागणीसाठी आशा स्वयंमसेविका व गट प्रवर्तक संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धुळे -प्राथमिक आरोग्य केंद दहिवेल मधील आशा स्वयंमसेविका व गट प्रवर्तक यांचे थकीत मानधन व ईतर कामाचा मोबदला देणे बाबत निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"] 

आशा स्वयंम सेविका व गटप्रवर्तक संघटनेतर्फे खालील महत्वाच्या प्रश्नाचे निवेदन करीत आहोत तरी प्रश्न ताबडतोब सोडवावेत ही विनंती नियमित मानधन वाढीव मानधन व कामावर आधारित मोबद्ला या बाबत सर्व पैसे दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रास वर्ग करण्यात आले असून सदर पैसा आशा स्वयंम सेविका व गटप्रवर्तक याना न देता सदर पैसे ईतर योजनेत खर्च केलेले आहेत अशी माहिती दि 18 एप्रिल 2022 रोजी मिळाली आहे.[ads id="ads2"] 

मानधन व कामावर आधारीत मोबद्ल्याचे पैसे दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्राने पैसे ईतर योजनेच्या कामासाठी वापरलेले आहेत. तरी मानधन व ईतर योजनेचे पैसे न देता ईतर योजनेवर खर्च करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी आम्ही आपणाकडे मागणी करतो आहोत सदर पैसे आशा स्वयंम सेविका व गट प्रवर्तक यांना 8 दिवसात न मिळाल्यास आशा सेविका व गटप्रवर्तक जिल्हा परिषद समोर प्रश्न सुटे पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करतील अशी माहिती आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे उपाध्यक्ष-युवराज बैसाने यांनी माहिती दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!