प्रेमी युगुलाची गळफास घेत आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी (Vishram Jinsi Taluka Raver)येथे प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे जिन्सी (Jinsi)  परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस (Raver Police) घटनास्थळी रवाना झाले आहे.[ads id="ads1"] 

या बाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यात विश्राम जिन्सी येथे एका मुलाने व मूलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवक आणि युवती ही अविवाहीत असुन गावापासुन जवळच काही अंतरावर असलेल्या शेतातील झाडाला दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत.[ads id="ads2"] 

    मुकेश गोकुळ पवार (वय २३) व गायत्री परशुराम पवार (वय १८ ) अशी दोघांची नावे आहे. प्रेम प्रकरणातुन या दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी कुजबुज ग्रामस्था मध्ये केली जात आहे. रावेर पोलिस निरिक्षक कैलास नागरे (PI Kailas Nagare) , पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे आदि सहका-यांसह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. दोघांची आत्महत्या केली असल्याची पोलिसांची प्राथमिक माहीती समोर येत आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!