वसुंधरा दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात महापौर सौ.जयश्री महाजन यांचा संदेश
जळगाव : आज आपल्या संपूर्ण भारतात जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी 22 एप्रिलला मोठ्या उत्साहात आपण हा दिन साजरा करतो. मात्र ज्या प्रकारे आपण आपले घर तसेच आपल्या जवळील सर्व परिसर स्वच्छ ठेवतो, त्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपण आपल्या पृथ्वीचीही काळजी घेतली पाहिजे. कारण पृथ्वीचे रक्षण केले तरच आपले रक्षण होईल,
[ads id="ads1"]
असा संदेश महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी शुक्रवार, दि.22 एप्रिल 2022 रोजी सकाळी मेहरुण तलाव परिसरात झालेल्या कार्यक्रमात दिला.
एनसीसीच्या महाराष्ट्र 18 बटालियनतर्फे ‘पुनीत सागर अभियान’ अंतर्गत जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत शहरातील विविध शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी एनसीसी कॅडेटस् यांच्यासमवेत स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून त्यांच्याशी संवादही साधला.
माननीय पंतप्रधानांच्या दृष्टीने, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) ने ‘पुनीत सागर अभियान’ हे राष्ट्रव्यापी फ्लॅगशिप अभियान सुरु केले आहे. समुद्र किनारे, नद्या तसेच तलावाच्या काठी आणि नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असलेल्या ठिकाणी प्लास्टिक आणि इतर कचर्याचे साहित्य गोळा करुन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे हा या अभियानातील मुख्य भाग आहे. राष्ट्रीय सागर दिनापासून ‘पुनीत सागर अभियान’ ची सुरुवात झाली असून सुमारे 50 लाखांहून अधिक नागरिकांच्या लोकसंख्येवर सकारात्मक प्रभाव पाडत एनसीसीच्या 17 राज्य संचालकांकडून सुमारे 1.5 लाख कॅडेटस् याअंतर्गत विविध क्रियाकलापांमध्ये भाग घेत आहेत. अभियानाचा मुख्य उद्देश लोकांना शिक्षित करणे आणि त्यांना ‘स्वच्छ भारत’ बद्दल शिक्षित करणे आहे. सुमद्र किनारे, नद्या तसेच तलावाच्या काठी आणि नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असलेले ठिकाण स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल स्थानिक नागरिकांना आणि भविष्यातील पिढ्यांकरिता जागरुकता वाढविण्याची कल्पना या अभियानाच्या माध्यमातून एनसीसी साकार करीत आहे.