रावेर परिसरात वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  दिवसेंदिवस विजेची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत वीज चोरीच्या समस्यांनी वीज वितरण कंपनी त्रस्त झालेली असताना दि. २२ रोजी विज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ३० घरी वीज चोरी पकडून चोरीचे साहित्य जप्त केले. यापुढे विज चोरी प्रकरणी रोज कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.[ads id="ads1"] 

   वीज वितरण कंपनीचे सावदा (Savada) येथील कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे याच्या आदेशानुसार व येथील उपकार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहायक अभियंता दिलीप सुंदराणी व प्र तंत्रज्ञ बी. सी साळुंके यांनी ही कारवाई केली. [ads id="ads2"] 

  सोबत कलींदर तडवी, उत्तमगिर गोसावी, तुषार चौधरी, धनंजय पाटील, अमोल हिवरे, सतिष सांगळे, चेतन भारते, अरुण माळी, कल्पेश पाटील, समीर तडवी, नजरखान जाबिरखान, दीपक पाटील होते. या सर्व वीजचोरांना वीज चोरीचे बिल देण्यात येणार असून ते न भरल्यास त्यांच्यावर पोलीसात गुन्हे दाखल केले जातील व अशीच धडक मोहीम रोज केली जाईल असा इशारा श्री सुंदराणी यांनी दिला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!