सुसाईड नोट लिहून उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या ; पतीला अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


चाळीसगाव येथील रहिवासी व कळवण तालुक्यातील अभोणा येथील माहेरवाशीण असलेल्या २६ वर्षीय विवाहितेने रविवारी रात्री ९ते १२ च्या दरम्यान अभोण्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  घटनास्थळी पोलिसांना विवाहितेने इंग्रजीत लिहिलेली सुसाइड नोट आढळून आली. विशाखा शैलेश येवले-वेढणे असे मृत विवाहितेचे नाव आहे. संशयित पतीला पोलिसांनी अटक केली आहे तर सासू-सासरे फरार आहेत.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे  की, १३ जुलै २०२१ रोजी चाळीसगावातील  विशाखाच्या कुटुंबीयांनी कळवण येथे तिचा थाटामाटात विवाह करून दिला होता. विवाहानंतर मात्र ‘पती शैलेश यास इस्कॉन धार्मिक संस्थेत मोठे होण्यासाठी संन्यास घ्यायचा होता. तुझ्याशी फक्त हळद लावण्यापुरतेच लग्न केले आहे. तुझ्याशी कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवता येणार नाही. तू येथे राहू नको, येथून निघून जा व आम्हाला मोकळे कर’ असे वारंवार बोलून सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads2"] 

   याप्रकरणी विवाहितेचा भाऊ तन्मय नरेंद्र वेढणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभोणा पोलिसांनी पती शैलेश रमेश येवले, सासरे रमेश महादू येवले, सासू रंजना रमेश येवले (सर्व रा. घाटरोड, ता.चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पती शैलेश यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात अाले. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एकनाथ भोईर तपास करत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!