समता फाऊंडेशन,औरंगाबाद व प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर अंतर्गत, रावेर तालुक्यातील अजंदे येथे दि,19 एप्रिल 2022 वार मंगळवार रोजी,कमी वजनाची बालके व जोखमीच्या गरोदर मातांसाठी,मोफत आरोग्य तपासणी व औषौधपचार शिबिर,आयोजित करण्यात आले होते.[ads id="ads2"]
सदरील शिबिरासाठी,अजन्दा उपकेंद्रचे CHO,डॉ,शंतनु अशोक पाटील.व समता फाऊंडेशन चे आरोग्य प्रतिनिधी,ईश्वर इंगळे.अजन्दा उपकेंद्रचे MPW दिपक बाविस्कर,तसेच आशासेविका,सविता कोळी यांचेसह आदि जण उपस्थीत होते.
समता फाऊंडेशन अनेक वर्षा पासून आरोग्य क्षेत्रात काम करत असून महाराष्ट्रातील 0 ते 05 वर्ष वयोगटातील मुलामुलींचे कुपोषण कमी करण्यावर ते लक्ष देत आहे.
त्या सोबतच अनेक ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेऊन वयस्क नागरिकांना मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून दृष्टी देऊन महत्वाचे काम करत आहे.


