महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त भीम जयंती निमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील सुंदर पातोंडी येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या सून धम्मज्योती शिंदे यांचा भीम - बुद्ध गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपान वामन शिरतूरे हे होते तर उपाध्यक्ष दिपक ज्ञानेश्वर शिरतूरे हे होते.[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे आयोजन "बुद्धिस्ट एकता मंच सुंदर पातोंडी" यांनी केले होते. सदर भीम बुद्ध गीतांच्या संगीतमय प्रबोधनपर कार्यक्रमाला मुक्ताईनगर तालुक्यासह संपूर्ण परिसरातील व्यक्तीची प्रबोधनपर कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बुद्धिस्ट एकता मंच सुंदर पातोंडी च्या सर्व सभासद मंडळींनी कर्तव्य बजावले.