रावेर तालुक्यातील खिर्डीच्या 58 वर्षीय प्रौढाचा लॉजमध्ये आढळला मृतदेह

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव बसस्थानक परिसरातील तिरुपती लॉजमध्ये गेल्या तीन वर्षांपासून राहत असलेल्या प्रौढाचा शनिवारी दुपारी १२ वाजता मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.लॉजमधील कर्मचाऱ्यांना उग्र वास येत असल्याने खोली क्रमांक ३०८ चा दरवाजा तोडून बघितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. प्रदीप गोविंद सोनवणे (वय ५८ रा. खिर्डी, ता. रावेर) असे मृताचे नाव आहे.[ads id="ads1"] 

   ते गेल्या तीन वर्षांपासून तिरुपती लॉजमध्ये खोली क्रमांक ३०८ मध्ये राहत होते. कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना लॉजमध्ये राहण्यास मनाई असतानाही सोनवणे तेथेच राहत होते. त्यांना दररोज मेसचे जेवण येत होते. त्यांचे आई वडील पत्नी खिर्डी येथे राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचे लग्न झाले . त्यांच्या राहण्याचा व जेवणाचा खर्च त्यांचे वयोवृद्ध वडील गोविंद सोनवणे हे त्यांच्या खात्यावर टाकत होते. गुरुवारी लॉजमध्ये उग्र वास येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी मालकाला सांगितले. [ads id="ads2"] 

  त्यानंतर खोली क्रमांक ३०८ मध्ये बघितले असता सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. त्याबाबत लॉज व्यवस्थापकाने जिल्हापेठ पोलिसांना कळविले. मृत सोनवणे यांच्याजवळ असलेल्या आधारकार्ड व इतर कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी या घटनेबाबत नातेवाइकांना कळवले. 

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील प्रेमी युगुलाची गळफास घेत आत्महत्या 

हेही वाचा :- अधिकाऱ्यांचा वचक न राहिल्यामुळे यावल शहराची शांतता धोक्यात....? वरिष्ठ अधिकाऱ्यांची होत आहे दिशाभूल

हेही वाचा :- शासकीय गोदामात निकृष्ट दर्जाचे धान्य : मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांची चौकशीची मागणी 

मृतदेह शवविच्छेदनासाठी जीएमसीत आणण्यात आला. सोनवणे यांचे हातपाय सुजलेले होते. त्यांना कावीळची लागण झालेली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!