विजेच्या शॉक लागून आयटी इंजिनिअर तरुणाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 विजेच्या शॉक लागून आयटी इंजिनिअर तरुणाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना


चोपडा (Chopda) तालुक्यातील मामलदे येथे एकीकडे लग्नाची धामधूम असताना दुसरीकडे २७ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणाचा पाण्याची मोटर लावत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे.[ads id="ads1"] 

मामलदे ता. चोपडा (Chopda Taluka Chopda)  येथील सुनील पाटील यांचे मोठे बंधू सतीश पाटील यांचा मुलगा महेंद्र पाटील याचे लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. शनिवारी दिनांक २३ रोजी मामलदे (Mamlade) येथे महेंद्र याचा हळदीचा कार्यक्रम होता लग्न घरात पाहुणे मंडळींची वर्दळ होती. [ads id="ads2"] 

  यावेळी बंगलोर (Banglore) येथे नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर असलेला अमोल पाटील हा 'वर्क फ्रॉम होम'मुळे घरून काम करीत होता. यावेळी अमोल सकाळी पाण्याची मोटर लावत असताना त्यास जोरात विजेचा धक्का बसला. यावेळी तो मागे फेकला जाऊन डोक्यावर पडला. डोक्यास जबर दुखापत होऊन अमोलचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील प्रेमी युगुलाची गळफास घेत आत्महत्या 

हेही वाचा :- अधिकाऱ्यांचा वचक न राहिल्यामुळे यावल शहराची शांतता धोक्यात....? वरिष्ठ अधिकाऱ्यांची होत आहे दिशाभूल

हेही वाचा :- शासकीय गोदामात निकृष्ट दर्जाचे धान्य : मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांची चौकशीची मागणी 

  याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भावाच्या लग्नापूर्वीच चुलत भावाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत अमोलच्या पश्चात वडील, आई, बहिण, लहान भाऊ असा परिवार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!