Pachora : मोबाईलवर स्टेट्स ठेवत म्हसास येथील युवकाची आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 पाचोरा तालुक्यातील म्हसास (Mhasas Taluka Pachora) येथील एका २९ वर्षीय युवकाने मोबाईलवरील व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत नैराश्यातुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदकरुन सदरीची नोंद शुन्य क्रंमाकाने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसास ता. पाचोरा येथील रहिवाशी कैलास आनंदा पाटील या २९ वर्षीय अविवाहित युवकाने दि. २९ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास गावातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. दरम्यान मयत कैलास पाटील याने आत्महत्या करण्यापूर्वी काहीवेळ आधी आत्महत्येबाबत मोबाईलवरील व्हाट्सअपवर स्टेटस (Whats Up Status)  ठेवले होते. [ads id="ads2"] 

  सदरील स्टेटस नातेवाईक व मित्रांनी बघताच सर्वत्र कैलास पाटील याचा शोध घेतला असता त्याचे काका यांच्या शेतातील विहीरीत कैलास पाटील याचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने कैलास पाटील याचा मृतदेह बाहेर काढुन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. 

  मयत कैलास पाटील याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे (Rural Hospital) वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात (Pachora Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रंमाकाने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला  (Pimpalgaon Hareshear Police Station) वर्ग करण्यात आली आहे. कैलास पाटील याचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभाव असलेल्या कैलास आनंदा पाटील याच्या अकस्मात मृत्यूने म्ससास गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!