Raver : गारबर्डी आदिवासी पाड्यावर आग लागून दोन घरे जळून खाक ; तीन शेळ्यांचा होरपळून मृत्यू : दोन कुटुंब उघड्यावर सव्वा दोन लाखाचे नुकसान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर तालुक्यातील गारबर्डी (Garbardi Taluka Raver) येथे दि. २९ एप्रिल शुक्रवार रोजी दुफारी 12 वाजता घराला अचानक आग लागल्याने दोन घर जळून खाक झाल्याची घटना घडली आग एवढी भयानक होती की घरातील एकही समान वाचवता आले नाही तीन शेळ्याचा होरपळून मृत्यु झाले या आगीतून फक्त अंगावरील कपडेच वाचले या आगीत दोन कुटुंब उघड्यावर आले.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की पाल पासून पाच किमी अंतरावरील गारबर्डी (Garbardi Taluka Raver)  या आदीवासी पाड्यावर गट न बत्तीस मध्ये दुफारी बारा वाजता अचानक आग लागल्याने या आगीत भांगी देलसिंग पावरा,सुरेश भांगी पावरा यांचे घर जळून खाक झाले. यात संसार उपयोगी वस्तू सह तीन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाले आगीतून एक वस्तूही वाचवता आले नाही. उदरनिर्वाह साठी साठून ठेवलेले धन्यही जळून खाक झाले.[ads id="ads2"] 

*सव्वा दोन लाखाचे नुकसान*

तीन शेळ्या, धान्य, संसार उपयोगीसाहित्य,शेती उपयोगी सहित्य,रोख रक्कम साठ हजार रुपये,गुरासाठी साठूऊन ठेवलेला चारा असे ऐकून सव्वा दोन लाखाचे नुकसान झाले.

*घर जळून खाक झाल्यानंतर मिळाले पाणी* 

जवळ्पास पाण्याची सोय नसल्याने शेजारच्या घरातील वापराचे पाणी टाकून आगीवर नियंत्रण आनण्याचे प्रयत्न केलं परन्तु आग एवढी भयानक होति की पाणी सम्पले पण आग विझविण्यात अपयश आलें शेवटी वनविभागाचे टँकर आणण्यात आले तोपर्यंत दोघी घरे जळून खाक झाली होती.घटनास्थळी ग्रामसेवक डी एम वळवी,तलाठी गुणवन्त बारेला कोतवाल आमीन तडवी यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी करून पंचनामा केला .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!