शौचालय घोटाळा प्रकरणी सत्ताधारी भाजपाची पत्रकार परिषद म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे - रावेर येथे महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर-भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या रावेर पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शौचालय अनुदानात घोळ होऊन या प्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]

  त्या अनुषंगाने महाविकास आघाडीतर्फे आज दि. २९ एप्रिल शुक्रवार रोजी रावेर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.या पत्रकार परिषदेत काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकारपरिषद घेण्यात आली होती त्याचा समाचार घेत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे यांनी पंचायत समितीत गेल्या १० वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्देश केले.[ads id="ads2"]

  श्री कोंडे यांनी काल भाजपातर्फे जि.प सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेचा उल्लेख करीत श्री महाजन यांनी फक्त पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दोषी धरले.मात्र गेल्या १०वर्षांपासून भाजपाची सत्ता असतानाही पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे झाले? याबाबत चकार शब्द काढला नाही. गेल्या १०वर्षांपासून पंचायत समितीत भाजपचे सभापती,उपसभापती असून गेल्या दीड वर्षात दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगत १०वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे कंत्राटी कामगार १०वर्षांपासून याच पंचायत समितीत एकाच टेबलावर कुणाच्या वरदहस्ताने राहिला ? त्यांची बदली यावल आणि मुक्ताईनगर येथे झाल्यावर दोनच महिन्यात त्यांना रावेर कोणी आणले?जिल्हापरिषदेकडून या प्रकरणी दरवर्षी ऑडीट होते मात्र त्यात हा घोळ का आढळला नाही?आणि आढळला असेल तर याबाबत कारवाई का झाली नाही? कारण जिल्हा परिषदेत ही १०वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे त्यामुळे संबंधितांना जिल्हा परिषदेतून यांना पाठीशी घातले गेले का? यासोबत प्रथमदर्शनी अधिकारी यात दोषी आहेत त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे मात्र झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांच्यावर कारवाईची महाविकास आघाडीची मागणी असून या प्रकरणी आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास देण्याबाबत ही जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना तालुक्यातील गोरगरीब जनता विश्वासाने निवडून देत असतांना एवढ्या मोठ्या घोटाळ्याबाबत सत्ताधारी गप्प बसल्याने त्यांनी जनतेच्या विश्वासाचा घात केला आहे.या प्रकरणाशी संबंधित २०१२पासून तत्कालीन पंचायत समिती अधिकारी,जिल्हा परिषदेचे अधिकारी,बँक अधिकारी,बीडीओ, लेखाधिकारी,ग्रामविस्तार अधिकारी यांच्यासोबत या प्रकरणात संबंधित पदाधिका-यांची ही चौकशी होणे गरजेचे आहे.एवढा मोठा घोटाळा होत असताना पं स चे सत्ताधारी मूग गिळून गप्प का आहेत?याचे ही जनतेला उत्तर मिळणे अपेक्षित आहे.यासोबतच शौचालय प्रकरणात १२ हजार अनुदान असतांना एवढा घोळ झाला तर गुरांच्या गोठ्याच्या प्रकरणात ७० हजार ते ८४हजार एवढे अनुदान असते त्यांच्याबाबत ही अनियमिततेबाबत,पंचायत समीती सेस फंड,सार्वजनिक शौचालय यांच्याबाबत ही आमच्याकडे तक्रारी असून त्यांची ही चौकशी करण्याची मागणी जिप सीईओ डॉ पंकज आशिया यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याबाबत आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याकडे निवेदन देणार असून या प्रकरणी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहोत.यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनीही या प्रकरणात पदाधिकारी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई करण्याबाबत पत्रकारपरिषदेत सांगितले. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष योगीराज पाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष पंकज वाघ,रावेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख मेहमूद,पं स सदस्य योगेश पाटील,अटवाड्याचे सरपंच गणेश महाजन आदी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!