ऐनपूर महाविद्यालयातील विद्यार्थिनींची एल आय सी शिष्यवृत्ती साठी निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 ऐनपुर प्रतिनिधी  (विजय अवसरमल)  भारतीय जीवन विमा योजना, नाशिक विभागा तर्फे देशपातळीवर २०२१- २२ या शैक्षणिक वर्षातील १० वी ,१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी एल आय सी च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली होती.या शिष्यवृत्ती साठी ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील ६ विद्यार्थिनींची एल आय सी च्या नाशिक विभागा अंतर्गत ३ वर्षांसाठी शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे.[ads id="ads2"]  

  या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थिनींना दरवर्षी २० हजार रुपये शिष्यवृत्ती एल आय सी कडून प्रदान करण्यात आली आहे. कु.अंकिता प्रेमचंद पाटील -प्रथम वर्ष कला कु.अंकिता बंडू पाटील -प्रथम वर्ष कला, कु. दिपाली सीताराम चौधरी -प्रथम वर्ष विज्ञान ,कु.भाग्यश्री विकास कोंडे -प्रथम वर्ष विज्ञान, कु. श्रद्धा रवींद्र तायडे- प्रथम वर्ष विज्ञान ,कुु. पूनम अशोक बोरोेले या विद्यार्थिनींची एल आय सी शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने व प्रा. प्रदीप एन.तायडे यांचे मार्गदर्शन लाभले.प्रत्येक विद्यार्थिनींना रु २०,०००/- पुढील तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील, उपाध्यक्ष रामदास महाजन, चेअरमन श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!