पंडित जवाहर लाला नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर अंतर्गत क्षेत्र कार्यकर्ता म्हणून 2021,22 अंतर्गत समाज कार्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे आय सी टीसी.व ए.आर.टी विभागाशी संलग्नित एच आय व्ही .बाधित रुग्णांना त्यांच्या पोषण आहारा बाबत आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.
आज रोजी ( nutrition food) संदर्भात प्रत्येक लाभार्थ्यांची भेट घेऊन गटाच्या मार्फत माहिती देण्यात आली पोषक आहारात दैनंदिन जीवनात यां आहाराचे फायदे काय असतात या बाबत समजावून सांगितले. औषधी उपचारा सोबत सकस आहार तेवढाच महत्वाचा असतो यांचे महत्व आज समाज कार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जाऊन सांगितले. या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्षस्थान डॉ. प्रशांत शिंदे , ए आर टी मेडिकल ऑफिसर डॉ.प्रकाश ताळे मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय ,जी एम पाटील, मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय अमळनेर तसेच समुपदेशक अश्वमेघ पाटील, दीपक शेलार व लॅब टेक्निशियन देवेंद्र मोरे उपस्थित होते.




