अनियमित धान्य पुरवठा वितरित केल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दहिवद येथील दोन स्वस्त धान्य दुकाने निलंबित केली आहेत. तसेच अमळनेर तालुक्यात राजकीय प्रभावाने एकालाच चार चार जोडलेली दुकाने काढून घेण्याची मागणी होत आहे.[ads id="ads1"]
अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील शिवाजी पारधी व इतर आठजणांनी दहिवद येथील भरत रामकृष्ण पाटील यांच्या दुकान नं. १४५ व १४६ विरुद्ध तक्रारी केल्या होत्या. याबाबत पुरवठा निरीक्षक चौकशीला गेले असता, त्यांना दुकान बंद दिसले व भरत पाटील हेदेखील अनुपस्थित होते. [ads id="ads2"]
अधिक चौकशी केली असता, दुकान नंबर १४५ मध्ये नियमित अंत्योदय लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ किलो धान्य कमी दिलेले आढलून आले एकूण 120 जणांना धान्य कमी दिले, तर प्राधान्य कुटुंबांना प्रत्येकी १ किलो धान्य कमी दिले. बऱ्याच तफावती आढळून आल्याने जिल्हा पुरवठा निरीक्षक सुनील सूर्यवंशी यांनी २० एप्रिलपासून दुकान नंबर १४५ व १४६ तात्पुरते निलंबित केले असून ही दुकाने जवळच्या स्वस्ता धान्य दुकानाला जोडण्यात यावीत. तहसीलदारांनी स्वतंत्र चौकशी करावी. असेही आदेशात म्हटले आहे.
भरत पाटील यांचे मूळ दुकान गंगापुरी येथे असून, त्यांना १० किमीवरील दहिवदची दोन दुकाने, २० किमीवरील अमळनेरचे दुकान अशी चार दुकाने एकाच दुकानदाराल जोडण्यात आली होती. याबाबत तक्रारदारांनी संशय व्यक्त केला आहे.