प्रतिनिधी (विजय अवसरमल)ऐनपूर ता. रावेर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला विज्ञान महाविद्यालयाचा खेळाडू एम. एस. स्सी. प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील ऋषीकेश ज्ञानेश्वर महाजन याने उत्कृष्ठ कामगिरी करून कांस्य पदक संपादित केले. [ads id="ads1"]
सदर अखिल भारतीय मिनी गोल्फ स्पर्धा सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ जयपूर (राजस्थान ) येथे दिनांक १६ ते २० एप्रिल २०२२ या कालावधीत संपन्न झाल्या. त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने व क्रीडा संचालक डॉ. सचिन एन. झोपे यांचे मार्गदर्शन लाभले. [ads id="ads2"]
सदर स्पर्धेत कांस्य पदक मिळाल्या बद्दल संस्थेचे चेअरमन श्री.श्रीराम पाटील अध्यक्ष श्री. भागवत विश्वनाथ पाटील सेक्रेटरी श्री. संजय वामन पाटील जॉइंट सेक्रेटरी श्री. आर. एन. महाजन श्री. विकास महाजन श्री.कैलास पाटील व महाविद्यालयातील क्रीडा समितीचे सदस्य डॉ.के.जी. कोल्हे, डॉ. आर व्ही.भोळे, प्रा. एस आर. इंगळे , डॉ. पी आर गवळी उपप्राचार्य श्री.एस. बी. पाटील तसेच डॉ. अमोल पाटील डॉ. आनंद उपाध्याय व कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी कांस्य पदक मिळाल्या बद्दल अभिनंदन केले.


.jpg)