रावेर - क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील माता रमाई महिला मंडळ व भिमालाय बहुउद्देशीय संस्थे तर्फे दि.१२ रोजी वक्तृत्व स्पर्धा व दि.१३ रोजी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
सदर स्पर्धेच्या विजेत्यांसाठी प्रथम बक्षीस रोख तीन हजार रुपये ,शिल्ड व प्रमाणपत्र ऍड. आर. के. पाटील व ऍड. सूरज चौधरी यांचे कडून, दुसरे बक्षीस रोख एकविशे रुपये ,शिल्ड व प्रमाणपत्र अमोल महाजन व सौ. मानसी पवार यांचे कडून तर तिसरे बक्षीस रोख अकराशे रुपये, शिल्ड व प्रमाणपत्र सुनिल महाजन यांचे कडून देण्यात येणार आहे.[ads id="ads2"]
स्पर्धा तक्षशिला बुद्ध विहार सावदा रोड रावेर येथे सकाळी दहा वाजता होणार असून बक्षीस वितरण आमदार शिरीषदादा चौधरी, खा. रक्षाताई खडसे, उद्योगपती श्रीरामदादा पाटील, सौ. रंजनाताई पाटील, दारा मो जफर मो, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, नायब तहसिलदार संजय तायडे, माजी नगराध्यक्ष शितल पाटील आदी मान्यवरांचे उपस्थितीत दि१४ रोजी सकाळी १० वाजता तक्षशिला बुद्ध विहार येथे करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा त्यासाठी ९६५७२३२४७६ ,८७८८७०३८६६ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे