जळगाव जिल्हा प्रतिनिधी (प्रमोद कोंडे)
मुक्ताईनगर बोदवड रावेर या तालुक्यात जास्तीत जास्त बहुतांशी शेतकरी हा केळी शेती उत्पादक शेतकरी असून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती चक्री वादळ व कोरोना सारखी महामारी यामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक संकटात आला असताना केळी उत्पादक शेतकरी हतबल झाला असून त्यात दिवसेंदिवस तापमानाचे प्रमाण वाढत असल्यामुळे हवामान आपत्तीची संकट केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आले आहे.[ads id="ads1"]
सध्या केळी उत्पादक शेतकर्यांचा इतर शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास या वीज वितरण कंपनीच्या झिरो लोडशेडिंगमुळे हातातून जाण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग वीज वितरण कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहे.[ads id="ads2"]
वीज वितरण कंपनीकडून रावेर मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात झीरो लोडशेडिंग च्या नावाखाली सुरू असलेली लोड सेटिंग तत्काळ थांबवा अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा थेट मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महावितरणाचे जिल्हा अधिक्षक अभियंता जळगांव यांना दिला आहे.