रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर - चाळीसगाव न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या जेष्ट वकील ऍड. एस. टी. खैरनार यांचे अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा एका पक्षकाराने प्रयत्न केला त्याचे निषेधार्थ आज रावेर वकील संघाने तहसीलदार रावेर यांना मंडलाधिकारी श्री. सचिन पाटील यांचे माध्यमातून निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध नोंदवून वकील संरक्षण कायदा त्वरित लागू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍड. सुदाम सांगळे, सचिव ऍड. प्रमोद विचवे, उपाध्यक्ष ऍड. शितल जोशी, सहसचिव ऍड. दिपक गाढे, जेष्ठ वकील ऍड. व्ही. पी. महाजन, ऍड. जे. जी. पाटील, ऍड. विपीन गडे, ऍड. योगेश गजरे, ऍड. सुभाष धुंदले, ऍड. बी. डी.निळे, ऍड.धनराज ई. पाटील,ऍड. शाहिद शेख, ऍड.दिपक पी. गाढे,ऍड. प्रदीप लहासे, ऍड. मोहन कोचुरे आदी उपस्थित होते.


