ऐनपूर ता.रावेर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात एम एस्सी च्या विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, प्रमुख वक्ते डॉ. के.जी .कोल्हे ,प्रमुख पाहुणे डॉ.आर.व्ही.भोळे तसेच डॉ. एस. एन. वैष्णव व कार्यक्रमाचे आयोजन समितीचे सदस्य डॉ.सचिन झोपे उपस्थित होते. [ads id="ads1"]
योग प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ.के.जी.कोल्हे सरांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व फायदे सांगितले. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत तसेच कोविड-१९ च्या काळात किती महत्त्व प्राप्त झाले आहे हे सांगितले. योगा दररोज केल्याने आपले शरीर व मन चांगले राहते.त्यासाठी नियमित योगासने केली पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. [ads id="ads2"]
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने सरांनी योगा दररोज केल्याने आपले तारूण्य टिकून राहते. असे उदाहरण देऊन सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन झोपे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. एस एन वैष्णव यांनी केले.


