ऐनपुर प्रतिनिधी ( विजय एस अवसरमल)
रावेर तालुक्यातील ऐनपुर गावात सरकारमान्य दोन रेशन दुकान क्र.६४ व ६५ असे असुन हे दुकानदार मनमानी करीत असल्याची तक्रार असून त्याविरोधात लवकरच लेखी तक्रार करणार असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील सरकारमान्य रेशन दुकानात दरमहा रेशनचा गहू तांदूळ व साखर चा माल येत असून कोविड 19 आजार हा 2020पासून सुरू असुन या कालखंडात कोणतंही कुटुंब भुकेले राहू नये म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुटुंब कल्याण योजना अंतर्गत गहू व तांदूळ फुकट वितरण करण्यात आले आहे व नियमित वाटप चा माल वितरण करण्यात आले आहे.[ads id="ads2"]
परंतू आजपर्यंत एका महिन्यात दोन्ही योजना चा माल ऐनपुर वासी यांना मिळाला नाही रेशन माल घेण्यासाठी दुकानावर गेले असता रेशन दुकानदार लोकांकडून अंगठे घरी जाऊन घेत असतात व दुकानावर माल घ्यायला या असे सांगून पंधरा दिवसांनी माल वाटप सुरू होते अंगठे ग्राहकांच्या घरी जाऊन घ्यावे असे शासनाचे निर्देश आहेत का? आणि आम्हाला शासनाच्या निर्देशापेक्षा कमी माल देत आहे याशिवाय रेशन माल घेतल्याची पावती रेशन दुकानदार आम्हाला देत नाही अशी ग्रामस्थांची तक्रार असून रेशन दुकानात आलेल्या मालाची नोंद तसेच मालाचा दर(भाव) असलेला फलक लावावा असे निर्देश असताना दुकानदार ते लावत नाही अशीही तक्रार ग्रामस्थांनी बोलून व्यक्त केली कोरोना काळात एका महिन्यात दोन वेळेस धान्य वितरण केले जात आहे ते म्हणजे एक नियमित वाटप दुसरी पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजना ची वाटप परंतु ऐनपुर येथे महीन्यात एकच वाटप केली जात आहे.कोणत्या महिन्यात पंतप्रधान कुटुंब कल्याण योजना चे धान्य वाटप तर दुसरा महीन्यात नियमित चे धान्य वाटप करण्यात येते परंतु एका महिन्यात आजपर्यंत दोन्ही योजना चे धान्य वाटप करण्यात आलेली नाही साखर वाटप या दुकानावर वर्षानुवर्ष पासुन दिसलेले नाही रेशन दुकान आहे असा दुकानावर फलक सुध्दा लावलेला नाही पुरवठा दक्षता समिती चा फलक सुध्दा लावलेला नाही किंवा रेशन दुकानात कोणता माल आला किती आला स्टॉक फलक नाही रेशन दुकानात तक्रार पुस्तक नाही या दुकानांमध्ये अनियमितता दिसत आहे असेही ग्रामस्थांनी सांगितले वाटप करीत असताना रेशन दुकान मालक थांबत नसुन रोजंदारी कामगार लावून वाटत होते त्या रोजंदारी कामगारांना कोणाला किती धान्य द्यावे हे सुद्धा माहीत नसते मग वाटप होते कशी एकाही महीन्यात नियमित वाटप होत नाही दक्षता समिती चा तलाठी हे सचिव असतात परंतु दिनांक ०४/०४/२०२२ रोजी वाटप सुरू झाल्यावर ग्रामस्थांच्या तक्रारी समजुन घेण्यासाठी तलाठी महोदय यांना सहा वेळेस भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तलाठी महोदय येतो असे सांगून आलेच नाही तरी यांची काही देवाण घेवाण तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे त्याच प्रमाणे ऐनपुर मंडळाचे मंडळ अधिकारी यांना सुध्दा भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते सुध्दा या ठिकाणी आले नाहीत यात काही गौडबंगाल तर नाही ना ? या रेशन दुकानदारावरती वरीष्ठ अधिकारी यांचा धाक राहीलेला नसून हे दुकानदार मनमानी करीत आहे सदर दुकानदार ग्रामस्थांची फसवणूक करीत असून या रेशन दुकांदारांची चौकशी होऊन कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


