यावल (सुरेश पाटील) येथील खाटीक वाड्यातील मटन मार्केट मधील बकऱ्यांच्या खाद्य टाकीला जाळी लावावी अशी मागणी रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मो.फैजान अब्दुल गफ्फार शाह यांनी व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे.[ads id="ads1"]
यावल नगर परिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्याकडे आज दि.7मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खाटीक वाडा मटन मार्केट मधील बकरीचे खाद्य असलेल्या टाकीला आउटलेट ची सुविधा उपलब्ध करून तसेच टाकीवर जाळी लावण्यात यावी सदर टाकीमध्ये बकरीचे खाद्य व्यवसायिक टाकत असून टाकीचे आउटलेट सुद्धा व्यवस्थित नसल्याने सदर खाद्यामुळे टाकीत आळ्या पडल्या आहेत.[ads id="ads2"]
त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे म्हणून तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्यावी सुविधा उपलब्ध न केल्यास रोगराई पसरल्यास संबंधित नगरपालिका कर्मचारी जबाबदार राहतील असे दिलेल्या निवेदनात रावेर यावल विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस अध्यक्ष मो.फैजान अब्दुल गफ्फार शाह यांच्यासह शकील तडवी,याकूब सय्यद, अशपाक सय्यद,जाबीर खाटीक,तौसिफ खाटीक,नईम खाटीक,साबिर असगर,इक्राम खाटीक,मुस्ताक खाटीक,इरफान खाटीक,साबीर खाटीक, इत्यादींनी आपली स्वाक्षरी करून मागणी केली आहे.