पाल येथील अपघातातील गंभीर जखमीचा अखेर मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 अपघातातील जखमीला पाल ग्रामीण रुग्णालयात बुधवारी सायंकाळी वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मोरसिंग प्रल्हाद चव्हाण (वय ५५, रा. पाल) असे त्यांचे नाव आहे.[ads id="ads2"]  

मोरसिंग चव्हाण, विक्रम भिल व त्यांचा मुलगा अनिल भिल हे तिघे फैजपूर येथून घरी पाल येथे परत येताना दुचाकींचा समोरासमोर धडक झाली. त्यात तिघेही जखमी झाले. त्यात मोरसिंग हे गंभीर जखमी होते. 

हेही वाचा :- दुचाकीवरील ताबा सुटल्याने एक जण ठार ; फैजपूरजवळची घटना

त्यांना सपोनि मेहबूब तडवी, उमेश नरवाडे, दीपक ठाकूर यांनी घटनास्थळावरून त्यांना पोलीस वाहनात नेऊन उपचारास रुग्णालयात दाखल केले. परंतु वेळेवर उपचार न झाल्याने मोरसिंग यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!