राजीव गांधी फाउंडेशन विकास संस्थेतर्फे आदिवासी पावरा व भिल समाजातील लहान मुले मुलीना अन्नदान वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने यावल येथील राजीव गांधी फाउंडेशन विकास संस्थेतर्फे यावल शहरातील गोरगरीब वंचित समाजातील आदिवासी पावरा व भिल समाजातील लहान मुले- मुली,महिला,पुरुषांना अन्नदान वाटप कार्यक्रम करण्यात आले.[ads id="ads1"] 

          या स्तुत्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार आर.डी.पाटील उपस्थित होते. जिल्हा परिषद गट नेते प्रभाकर आप्पा सोनवणे,जळगाव जिल्हा कॉग्रेस पार्टी इंटक कामगार संघटना अध्यक्ष भगतसिंगबापू पाटील यांच्या हस्ते उपस्थित आदिवासी मुला-मुलींना स्त्री-पुरुषांना अन्नदान वाटप करण्यात आले.[ads id="ads2"] 

  कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले,उपनगराध्यक्ष अभिमन्यु चौधरी,सामाजिक कार्यकर्त्या सौ.बेबीताई धनगर,काँग्रेस यावल शहराध्यक्ष कदीरखान,ज्ञानेश्वर कोळी,नावरे ग्रामपंचायत सरपंच समाधान पाटील,प्रदीप पाटील, गफ्फार शहा,सुधाकर धनगर यांच्यासह राजकीय सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक एस.के.बाऊस्कर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक तथा राजीव गांधी फाउंडेशन विकास संस्था अध्यक्ष विजयकुमार गजरे यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!