बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानसाधनेच्या जोरावर, रक्ताचा थेंब ही न सांडता महान क्रांती घडवून आणली- लक्ष्मणराव पाटील

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 धानोरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान व फलकाचे अनावरण 

धरणगांव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगांव - धरणगाव तालुक्यातील धानोरे गावात महामानव - भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या जयंती महोत्सवाचे प्रास्ताविक कुंदन शिरसाठ यांनी करून वक्त्यांचा परिचय करून दिला.[ads id="ads1"] 

            या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी  भगवान भाऊ महाजन होते. व प्रमुख वक्ते म्हणून विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक हेमंत माळी, पी.डी. पाटील, जळगांवचे श्रीकांत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून RTI चे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ होते.[ads id="ads2"] 

   कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते व मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कु.पृथ्वी नरेंद्र शिरसाठ हिने बुद्धवंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.

          कार्यक्रमाचे वक्ते  हेमंत माळी व पी.डी.पाटील यांनी बाबासाहेबांच्या जीवनपट उलगडून त्यांचे सामाजिक - शैक्षणिक कार्य विशद केले.  बाबासाहेबांनी लहानपणी जातिभेद सोसला, पाण्यासाठी, मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानत रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृति ग्रंथाचे दहन केले. बाबासाहेबांचे गुरु तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले होते. यानंतर धानोरे गावातील जवळ- जवळ २४ विद्यार्थ्यांनी बाबासाहेब, तर २ मुलींनी तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवन कार्याविषयी मराठी, इंग्रजी, भाषेतून मनोगत व्यक्त केले. माता रामाई यांच्या जीवन कार्यावर हिंदी भाषेतून कविता सादर केली.

         कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते लक्ष्मणराव पाटील व श्रीकांत पाटील यांनी बाबासाहेबांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकून विविध उदाहरण दाखले देऊन त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. बाबासाहेबांचा जयंती महोत्सव १५२ देशात साजरा केला जातो. महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

           याप्रसंगी सर्व प्रमुख अतिथी, वक्ते व सहभागी विद्यार्थ्यांना भिम संघर्ष ग्रुप धानोरा यांच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रणाली लोटन विसावे दीपक वामन शिरसाठ यांनी केले.

           या जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी भिम संघर्ष ग्रुप धानोरा व समस्त धानोरा ग्रामस्थ यांनी परिश्रम घेऊन अनमोल सहकार्य केले. या जयंती महोत्सवाचे सूत्रसंचालन सुमेध सुरवाडे, तुषार बागुल तर आभार प्रिया विजय शिरसाठ यांनी केले.

            यानंतर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाचे अनावरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!