ऐनपुर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)

ऐनपुर येथे विश्वरत्न क्रांतीसुर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे दिनांक १५/०४/२०२२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी ५.३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ऐनपुर चे सरपंच अमोल महाजन यांनी केले.[ads id="ads1"] 

   डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन अवसरमल यांनी करून वार्डातील ग्रामपंचायत सदस्य सतिष अवसरमल अनिल जैतकर रुपाली अवसरमल डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर फलकाचे पुजन केले भारतीय बौद्ध महासभेचे बौधाचार्य केंद्रिय शिक्षक विजय एस अवसरमल यांनी त्रिसरण पंचशिल दिले.[ads id="ads2"] 

   नंतर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ शामू पाटील भगवान महाजन रघुनाथ पाटील पाडुरंग पाटील युवराज महाजन अक्षय महाजन निलेश जैस्वाल कमलेश महाजन शेख नजीर मेंबर शेख शेफी यांनी पुष्प उडवून जयंती मिरवणूकीला सुरुवात केली नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर सर्व भिमसैनिक व महीला यांनी एकच ठेका धरुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले मिरवणूक संपूर्ण गावातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत काढण्यात आली मिरवणुकीत थंड पाण्याची व्यवस्था दि फिनिक्स फौडेशन यांचे संस्थापक अध्यक्ष सचिन अवसरमल यांनी ५० पाण्याचे जार ठेवून केली होती तर बसस्टँड परिसरात मुस्लिम समाज्याच्या बांधवांकडून थंड शरबत ठेवण्यात आले होते सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध समाजाचा एकोपा या ठिकाणी दिसून येत होता सर्व गुण्या गोविंदाने नाचण्याचा आनंद घेत होते मिरवणुकीला शेजारील खेड्यापाड्यातील लोक आले होते मिरवणूकीला निंभोरा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गणेश धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर चौधरी रीजवान पिंजारी पुजा वंजारी यांनी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला या मिरवणुकीत ऐनपुर येथील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील भिमसैनिक महीला पुरुष उपस्थित होते मिरवणूकीचा समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!