यावल (किरण तायडे) यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे मागील गुन्ह्या बद्दल टोचुन बोलल्याच्या कारणावरून दोन गटात दंगल उफाळली यात परस्परां विरूध्द, १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना शुक्रवारी रात्री घडली असुन दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले आहे.[ads id="ads1"]
त्याचं वेळी रस्त्यात शुभम प्रमोद धनगर, निलेश संजय धनगर, संदीप संजय धनगर, गणेश मधुकर धनगर यांनी मागील एका गुन्ह्या बद्दल आमचे लोक सुटुन आले तुमच्याने काहीच झाले नाही असे टोचुन सांगीतले तेव्हा याचा जाब विचारल्यावर वरिल चौघांनी आणी पुन्हा संजय वसंत धनगर, कैलास वसंत धनगर, प्रमोद वसंत धनगर व बबलु कैलास धनगर अशा आठ जणांनी त्यात जबर मारहाण केली.
तेव्हा फिर्यादी व त्यांचा मुलगा तेथे गेला व भांडण सोडवून जखमी लखन कोळी यास यावल ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले व वरील आठ जणांविरूध्द दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप सुर्यवंशी करीत आहे.
दुसऱ्या गटाकडून गुन्हा दाखल
संजय वसंत धनगर रा. सांगवी खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार वरिल कारणावरून झालेल्या हाणामारीत लखन कोळी, सुनिल कोळी, सागर कोळी, चंद्रकात कोळी, दिलीप कोळी, तारांचद कोळी, भागवत कोळी, रविन्द्र पोपट कोळी, विकास गणेश पाटील व महेन्द्र भगवान कोळी अशा दहा जणांनी फिर्यादी सह संजय धनगर, प्रमोद धनगर, कैलास धनगर यांना मारहाण करीत जखमी केले म्हणुन दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



